मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य संचालनालय अंतर्गत तब्बल ५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्यात आली आहे.
सदर भरती ही विविध पदासांसाठी केली जाणार आहे, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती अशी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट, कॅटलॉगर, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ, ऑक्युपेशनथेरेपीस्ट, व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका, वॉर्डन वसतीगृह प्रमुख, वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक, दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ या पदांसाठी भरती होणार आहे.
तसेच सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ, ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ, ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक, जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक, शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार, सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल, गृहपाल, लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री, बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका. या पदांच्या हजारो रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वरील पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. पदांच्या आवश्यकतेनुसार असून शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी http://www.med-edu.in या बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षापर्यंत अशी असणार आहे. या पदांसाठीचे अर्ज संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २५ मे पर्यंत अर्ज दाखल करता येतील. खुला प्रवर्गास १ हजार रूपये व बँक चार्जेस, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ उमेदवारांना ९०० रूपये, बँक चार्जेस असे सुल्क लागेल.
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी http://www.med-edu.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या संबंधित सविस्तर माहितीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Government Department Bumper Recruitment Job Vacancy