मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राज्य सरकारने ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसे आदेश काढण्यात आले आहेत. नव्या बदलीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे
१. श्री राजेंद्र भोसले, IAS (2008) जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची जिल्हाधिकारी, मुंबई उप-शहरी जिल्हा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, IAS (2011) मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, औरंगाबाद यांची जिल्हाधिकारी, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. श्री राधाबिनोद शर्मा, IAS (2011) जिल्हाधिकारी, बीड यांची मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. श्री सिद्धाराम सलीमथ, IAS (2011) यांची जिल्हाधिकारी, अहमदनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. श्रीमती निधी चौधरी, IAS (2012) जिल्हाधिकारी, मुंबई उप-शहरी जिल्हा, मुंबई यांची सहआयुक्त, विक्रीकर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Government 5 IAS Officers Transfer