गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी इतक्या लाखाच्या निधीस मान्यता

by Gautam Sancheti
जुलै 27, 2025 | 7:40 am
in राज्य
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार,नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री मकरंद जाधव-पाटील
राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या राष्ट्रीय महामार्ग बायपासचे प्राथमिक काम पूर्ण…जिल्हाधिकारी व सल्लागारांची संयुक्त पाहणी

Next Post

देशातील पहिली ही खासगी चाचणी सुविधा सुरू…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
TEMA2BRPB

देशातील पहिली ही खासगी चाचणी सुविधा सुरू…

ताज्या बातम्या

cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011