शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळतेय नोकरी… इच्छुक उमेदवारांना संधी

by India Darpan
ऑगस्ट 20, 2024 | 2:39 pm
in राज्य
0
gov e1709314682226

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दरवर्षी युवा वर्ग शिक्षण पूर्ण करून मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात असतो. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी येतात. दुसरीकडे अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत होते.

मात्र, राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनें”तर्गत नोकरीइच्छुक उमेदवारांना शासकीय कार्यालय / खाजगी आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणद्वारे विद्यावेतनासह अनुभवाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबवली जात आहे.

या योजनेची लाभार्थी तेजस्विनी कुलथे म्हणाली, माझे शिक्षण बी. कॉम. जी. डी. सी. ए. झाले आहे. मला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास व मार्गदर्शन केंद्रात संधी लाभली आहे, त्यासाठी मला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होते. पण, अनुभवाअभावी नोकरी मिळत नव्हती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून शासकीय कामकाज पाहण्याची, त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या अनुभवाचा फायदा भविष्यात नक्की होईल. या विद्यावेतनाचा उपयोग पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या शोधार्थ होईल, असे ती म्हणाली.

योजनेची आणखी एक लाभार्थी सुमय्या शेख म्हणाली, माझे शिक्षण एम. कॉम झाले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मला कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास व मार्गदर्शन केंद्रात शिकाऊ उमेदवारी मिळाली आहे. त्यासाठी मासिक विद्यावेतनही मिळत आहे. यासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे.

काय आहे योजना?
या योजनेंतर्गत www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक/शासकीय/ निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/महामंडळ इ. कार्यालये जोडली जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल. तसेच, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

पात्रता पुढीलप्रमाणे –
उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या

योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार आणि शासकीय / निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळ इ. कार्यालय तसेच विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. विभाग www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील. सदर नोंदणी पश्चात उमेदवारांनी त्यांचे लॉगइनद्वारे संबंधित आस्थापनेने अधिसूचित केलेल्या रिक्त पदांकरिता ऑनलाईन अॅप्लाय करावयाचे आहे.

नाशिक जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी आस्थापनांवर सुमारे १५ हजार कार्य प्रशिक्षणाच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तसेच, जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय कार्यालयांची एक हजारपेक्षा जास्त रिक्तपदे अधिसूचित झाली आहेत. याकरिता आयटीआय, सिव्हील / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री / ए.एन.एम. / जी.एन.एम/डी. फार्मसी/डी.एम.एल.टी, पदवीधर / पदव्युत्तर, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन तसेच MSCIT शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत.

तसेच खाजगी आस्थापनांची ४२०० पेक्षा जास्त रिक्तपदे प्राप्त झाली असुन याकरिता आयटीआय/पदवी/पदव्युत्तर / इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री इ. शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र ठरणार आहेत. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत बारावी – रु.६०००/-, आय.टी.आय, पदविका – रु.८०००/-, पदवी / पदव्युत्तर- रु. १००००/- इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जना करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.

याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर तरोच ०२५३ २९९३३२१ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
(संकलन जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार…सरकारने SIT गठित करण्याचे दिले आदेश

Next Post

सासरच्या जाचास कंटाळून जावयाची आत्महत्या…पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
sucide

सासरच्या जाचास कंटाळून जावयाची आत्महत्या…पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011