विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : भारतात अनेक किल्ले शेकडो वर्ष जुने आहेत. काही किल्ले तर इतके जुने आहेत की, ते कधी व कोणाद्वारे बांधले गेले ? हे कोणालाही माहिती नाही. त्यातील अशाच एका प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ल्याला ‘सापांचा किल्ला’ म्हणतात.
महाराष्ट्रातील हा किल्ला सुमारे ८०० वर्षांहून अधिक जुना असून त्याला ‘पन्हाळगड ‘ असे म्हणतात. तो पनाळा आणि पनाला इत्यादी नावांनी देखील ओळखला जातो. असे मानले जाते की, तो शिलाहार शासक भोज ( दुसरा ) याने सन ११७८ ते १२०९ दरम्यान बांधला.
\या किल्ल्याशी निगडित अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत असे म्हणतात. पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यापासून दक्षिण-पूर्वेस २० कि.मी. अंतरावर आहे. पन्हाळा एक लहान शहर आणि हिल स्टेशन असले तरी त्याचा इतिहास शिवाजी महाराजांशी संबंधित आहे.
सदर किल्ला यादव, बहमनी आणि आदिल शाही अशा अनेक राजवंशांच्या ताब्यात गेला असला तरी १६७३ मध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ताब्यात घेतला. शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात दीर्घ काळ वास्तव्य करीत होते. येथे त्यांनी ५०० पेक्षा जास्त दिवस घालवले. पुढे कालातंराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पन्हाळा किल्ल्याला ‘सापांचा किल्ला’ असे म्हणतात. कारण त्याची रचना झिग-झॅग आहे, म्हणजे आपल्याला असे दिसते की, साप चालत आहे. या किल्ल्याजवळ जुना राजवाड्यात कुलदेवी तुळजा भवानी मंदिर असून त्यामध्ये एक गुप्त बोगदा बनविला गेला आहे, तो थेट २२ किमी अंतरावरील पन्हाळा किल्ल्यावर उघडतो. सध्या हा बोगदा बंद आहे.
पन्हाळा किल्ल्यात तीन मजली इमारतीच्या तळाशी छुप्या पद्धतीने एक बांधकाम केले आहे. ती इमारत आदिल शहा यांनी बांधली होती. त्याच्या बांधकामाचे कारण म्हणजे जेव्हा शत्रूंनी किल्ल्यावर हल्ला करेल, तेव्हा या गुप्त इमारतीत जाऊन जवळच्या विहिरी किंवा तलावांमध्ये असलेल्या पाण्यात विष मिसळता येईल.