नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्यात 61,952 चौरस किलोमीटर इतके नोंदणीकृत जंगल क्षेत्र आहे असे दिसून आले आहे. यामध्ये 50,865 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील राखीव जंगले, 6,433 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील संरक्षित जंगले आणि 4,654 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील बिगर वर्गीकृत जंगले यांचा समावेश आहे. बिगर वर्गीकृत जंगलांमध्ये राखीव तसेच संरक्षित जंगलांचा भूभाग वगळता राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वन विभागाने नोंदणी केलेल्या इतर जंगलांचा समावेश होतो.
तसेच, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार उपरोल्लेखित वनक्षेत्रापैकी 228.81 हेक्टर भागावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काल 14 मार्च 2022 रोजी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही महिती दिली. त्याखेरीज, देशातील एकूण नोंदणीकृत वन क्षेत्र आणि अतिक्रमणाखाली असलेले वनक्षेत्र यांचा राज्य-निहाय तपशील खाली दिला आहे. आयएफएसआर अर्थात भारतातील वनसंबंधी अहवाल, 2021 नुसार देशात एकूण 7,75,288 चौरस किलोमीटर क्षेत्र वन क्षेत्र म्हणून नोंदणीकृत झालेले आहे.
महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश निहाय नोंदणीकृत वन क्षेत्राविषयीचे तपशील: (आयएफएसआर-2021 नुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील नोंदणीकृत वन क्षेत्र)
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ – 3,07,713
संरक्षित जंगल – 50,865
प्रतिबंधित जंगल -6,433
अवर्गीकृत जंगल – 4,654
एकूण वनक्षेत्र – 61,952
(क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये)