नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे येवल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील या मार्गावर छोट्या स्टेशनवरून बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसला सुधारित एलएचबी डबे जोडताना स्लीपर कोच डबे पूर्वीप्रमाणेच १० ठेवून त्या सर्वांचे रूपांतर एलएचबी डब्यांमध्ये करण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्सप्रेसचे एलएचबी डब्यांमध्ये रूपांतर करताना स्लीपर डबे १० वरून थेट २ न करता ७ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकूण बर्थची संख्या पूर्वीइतकीच उपलब्ध झाली आहे. या गाडीला १८ नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.
या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात आले असून ते आधुनिक ‘लिंक हाफमन बूश’ डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव आपल्या येवलेकर प्रवाशांना घेता येणार आहे.या रेल्वेगाडीची संरचना आता १ द्वितीय वातानुकुलित कोच, ४ तृतीय वातानुकुलित कोच, ७ शयनयान कोच, ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच, १ सामान्य द्वितीय श्रेणी कोच, १ जनरेटर कार अशी असणार आहे.
वजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात आले असून ते आधुनिक एलएचबी डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. या नव्या कोच मुळे येवला मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांना आता अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवास यामुळे करता येणार आहे.
