महाराष्ट्रात मंदिराला ७.८५ रुपये
तर
मशीद व चर्चला १.८५ रुपये दराने वीज
असे का?
आपले लाईट बील कमी करून घ्या!
सामान्य ग्राहक, मंदिर ट्रस्ट मधील सभासद जागृत व्हा!
औद्योगिक ग्राहक, व्यावसायिक ग्राहक, व्यापारी ग्राहक, असे सर्व वीज ग्राहकांनी वीज दरवाढ बाबत हरकती नोंदवा!
सध्या एक मेसेज फिरतो आहे की मंदिराला 7.85 रुपये प्रती युनिट दर तर मशीद आणि चर्चला मात्र 1.85 रुपये प्रति युनिट दर लागू आहे.
सर्व धार्मिक स्थळावरील मीटर रीडिंग हे तीनशे युनिट पेक्षा जास्त होते त्यामुळे रुपये 7.85 असा दर निश्चितच त्यांना पडतो परंतु MERC ने मागे मंजुरी दिल्यामुळे मशीद आणि चर्चना वीज दर वाढीमध्ये सवलती मिळत आहेत पण मंदिरांना मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
मंदिर, मस्जिद, चर्च यांचे इलेक्ट्रिसिटीचे दर मधील तफावत दूर करणे साठी आपण ग्राहक म्हणून खालील गोष्टी केल्या पाहिजेत.
तिनही धार्मिक स्थळे ही ग्राहक आहेत आणि प्रत्येक ग्राहकांना तोच दर लावला पाहिजे परंतु Maharastra Electricity Regulatory Authority
(MERC) दर rivision साठी नोटिफिकेशन काढते तेव्हा एकूणच सर्व ग्राहक त्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. परंतु ग्राहक म्हणून आपण सर्व गोष्टी पहात नाही आणि त्यातील ज्या तरतुदी असतात त्यावर वेळीच ऑब्जेक्शन/आक्षेप घेत नाही. त्यामुळे सदर आक्षेप घेतला नाहीतर नंतर कितीही तक्रारी केल्या तरी त्यावर काहीही होणार नाही.
MERC ने २९ ऑक्टो २०२२ रोजी वीज ग्राहकांना पुढील साधारण ५-६ वर्षासाठी होणारी वीज दर वाढ, सवलती, गळती इत्यादी बाबत सर्व ग्राहकांकडून हरकती मागवल्या आहेत.
आपण याबाबत www.MERC.gov.in या संकेत स्थळावर सदर दर वाढ बाबतचे प्रारूप प्रसिद्ध केले आहे ते नक्की वाचा. हातातील मोबाईलचा चांगला वापर करा.
सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी याबाबत आपल्या हरकती, सूचना या इमेलने पाठवा. त्यासाठी खालील ईमेल आयडी आहे. suggessions@merc.gov.in
आपणास पोस्टाने पाठवायच्या असतील तर त्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, 13 वां मजला, केंद्र क्र १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई ४००००५ इथे पाठवा.
2016 नंतर आता ६ वर्षांनी हे दर बदल होत आहेत आणि ते पुढील ५-६ वर्षासाठी लागू होतील.
सर्व मंदिर प्रशासनातील सदस्यांनी याबाबत जास्त लक्ष द्यावे आणि सर्व धार्मिक स्थळांना सारखे दर हवेत ही मागणी करावी.
बऱ्याच हिंदू धार्मिक स्थळांवरील ट्रस्ट मध्ये कलेक्टर हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे ते याबाबत कदाचित पुढाकार घेणार नाहीत परंतु सेक्रेटरी आणि इतर सभासद यांनी याबाबत आपली बाजू मांडून वीज बिलातील ही तफावत दूर करणे साठी प्रयत्न करावेत.
नकारात्मक पोस्ट फॉरवर्ड करणे पेक्षा सकारात्मक काम करू आणि ग्राहक म्हणून आपण सर्वजण एकत्रित रित्या MERC कडे हरकती नोंदवू.
आपण प्रत्येक वीज ग्राहकाने हरकती नोंदवल्या पाहिजेत. ग्राहक संघटना हरकती घेतील आपण कशाला हरकती नोंदवायच्या असा विचार करू नका.
सर्व ग्राहक मित्रानो, चला संघटित होऊ आणि वेळीच हरकती घेऊ आणि पुढील ५-६ वर्षे अकारण वीज दरवाढ होणार नाही याची काळजी घेऊ.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे – 9421526777
Maharashtra Electricity Rate Different Religious Places
Vijay Sagar Consumer MERC MSEDCL