गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात कोणता पक्ष आघाडीवर…कोणाला बसणार धक्का

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2024 | 2:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
election 1

गौतम संचेती, नाशिक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी मुख्य लढत बहुतांश मतदार संघात आहे. सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहे. पण, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने आघाडी घेतली आहे. तर त्या खालोखाल शिवसेना ठाकरे गटाल जोरात आहे. तर भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तीन ते चार मतदार संघात अपक्ष उमेदवार जोरात आहे. माकप व एमआयएम सुध्दा इंन्ट्रीची अपेक्षा आहे….

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. तर भाजपने पाच जागा जिंकल्या. तर शिवसेनाला २ व काँग्रेस व एमएमआयला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही आमदार शिंदे गटात तर राष्ट्रवादीचे ६ आमदार हे अजित पवार गटात गेले. तर काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहे.

या निवडणुकीत महायुतीने विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे निश्चित केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहे. तर त्या खालोखाल भाजपला ५ जागा मिळाल्या आहे. शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळणार आहे. मालेगावच्या जागेवर महायुतीने उमेदवार दिलेला नाही.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच व शिवसेना ठाकरे गटाला सहा, काँग्रेसला तीन व एक जागा माकपला गेली आहे. शरद पवार गटाला येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व, सटाणा, शिवसेना ठाकरे गटाला नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, नांदगाव, निफाड, मालेगाव या जागा मिळाल्या आहे. तर काँग्रेसला चांदवड, मालेगाव व इगतपुरी हे मतदार संघ सोडण्यात आले आहे. कळवण येथे माकपचा उमेदवार आहे. जिल्ह्यातील या १५ मतदार संघात बहुतांश ठिकाणी प्रचाराच्या अंतिम दिवसानंतर चुरस असल्याचे बोलले जात आहे. पण, काही मतदार संघात आजच चित्र स्पष्ट झाले आहे.

अशी आहे १५ विधानसभेत लढत
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी पवार गट)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) – अनिल कदम ( शिवसेना ठाकरे गट), गुरुनाथ कांदे (प्रहार)
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) – जे. पी. गावित (माकप)
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )- उदय सांगळे (महाविकास आघाडी)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – सुनीता चारोस्कर (शरद पवार गट)
देवळाली – सरोज आहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) , डॅा. राजश्री अहिरराव (शिवसेना शिंदे गट), योगेश घोलप (ठाकरे गट), अविनाश शिंदे (वंचित)
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – लकी जाधव (काँग्रेस) निर्मला गावित (अपक्ष)

मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) – अव्दैय हिरे ( शिवसेना ठाकरे गट), बंडुकाका बच्छाव (अपक्ष)
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) – गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे गट), समीर भुजबळ, डॅा. रोहन बोरसे (अपक्ष)

नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) – गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट), प्रसाद सानप (मनसे), जितेंद्र भावे (निर्भय)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) – वसंत गिते (शिवसेना ठाकरे गट), मुशीर सैय्यद (वंचित)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट) – दिनकर पाटील (मनसे), दशरथ पाटील (स्वराज)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) – दीपीका चव्हाण (शरद पवार गट)
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – शिरीष कोतवाल (काँग्रेस), केदा नाना आहेर (अपक्ष)

मालेगाव – मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम) – एजाज बेग (काँग्रेस), शान ए हिंद (समाजवादी), आसिफ शेख (अपक्ष)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र चेंबरच्या वीजदर विषयक समितीचे चेअरमन प्रतापराव होगाडे यांचे निधन….

Next Post

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार…गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
rape

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011