इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल आज वाजणार आहे. दुपारी ३.३० वाजता राष्ट्रीय निवडणूक आयोग राज्याच्या विधानसभेची पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहे. त्यानंतर आचारसंहिता घोषित होईल. कालच या घोषणेची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली होती. ती आज खरी ठरली. दर मंगळवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारीच घेण्यात आल्यामुळे ही चर्चा जोरात सुरु झाली होती.
कालच्या बैठकीत तब्बल १९ मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची सात जणांची यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या चर्चेला उधाण आले होते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्री आणि आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात रवाना झाले होते. त्यामुळे ही चर्चा सुरु झाली होती. आज महाराष्ट्र बरोबरच झारखंड विधानसभेचाही निवडणूक कार्यक्रम घोषीत होऊ शकता.
असा आहे अंदाज
महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता दिनांक १५ ऑक्टोबर पासून सुरु होईल. १९ नोव्हेंबरला निवडणूक व २२ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.