इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार असून ते मुंबईला भेट देणार आहेत.
या दौऱ्यात उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (ICAR-CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिनाला आणि मुंबईतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.