मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलींच्या पालकांसाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे. कारण, महिन्याकाठी राज्यात शेकडो मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विविध कारणांमुळे अल्पवयीन आणि तरुण मुली घर सोडत आहेत. विशेष म्हणजे या मुलींचा तपास होत नसून त्या कुठे जात आहेत, कोण पळवत आहे, त्यांचे अपहरण होत आहे की अन्य काही कारणे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्यातल्या बेपत्ता झालेल्या मुलींच्या शोधासाठी तातडीनं विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्य सरकारला केली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात सोळाशे, फेब्रुवारीमध्ये अठराशे आणि मार्चमध्ये बाविसशे मुली राज्यातून बेपत्ता झाल्याचं त्या म्हणाल्या.
गेल्या २ वर्षांपासून देशात मुली बेपत्ता होण्याचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महिला आणि कुटुंब कल्याण विभागानं याप्रकरणी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बघा, हा व्हिडिओ
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1655210579450273794?s=20
अल्पवयीन व तरुण मुली पळून जाण्याची आकडेवारी अशी
जानेवारी – १६००
फेब्रुवारी – १८००
मार्च – २२००
Maharashtra Crime Missing Minor Young Girls