गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्र संघाच्या कर्नाटक व पुदुचेरी दौऱ्यासाठी नाशिकच्या या खेळाडूंची निवड…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 17, 2024 | 12:16 am
in स्थानिक बातम्या
0
cricket


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे, नव्या २०२४ -२५ हंगामासाठी महाराष्ट्र संघ निवड प्रक्रिया सुरु असून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांची महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरातून महाराष्ट्र संघाच्या कर्नाटक व पुदुचेरी दौऱ्यासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र रणजी संघ निवड करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा अतिशय महत्वपूर्ण आहे.

सत्यजित बच्छाव व मुर्तुझा ट्रंकवाला निखिल नाईकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ए संघातर्फे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेकरीता सराव दौऱ्यावर जात असून, साहिल पारख हर्शल काटेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र बी संघातर्फे पुदुचेरी सराव दौऱ्यावर जात आहे.

डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला हे अनुभवी रणजीपटू आहेत. तर १९ वर्षांखालील उदयोन्मुख युवा खेळाडू डावखुरा सलामीवीर याची पहिल्यांदाच रणजी शिबिरासाठी निवड झाली. सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.

सत्यजित बच्छाव – यंदाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला. सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला होता. सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे . २०१८-१९ या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे.

मुर्तुझा ट्रंकवाला, नाशिकचा सलामीचा फलंदाज याचे महाराष्ट्र संघातर्फे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय- च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत २०२३-२४ च्या हंगामात दमदार पुनरागमन झाले. संधी मिळताच विदर्भ संघा विरुद्ध दुसऱ्या डावात मुर्तुझा ट्रंकवालाने १२६ चेंडूत १५ चौकारांसह ८६ धावा केल्या. २०१७ सालीच मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते व पदार्पणातच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला होता. मुर्तुझा २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचाही कर्णधार होता.

साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या हाय परफॉरमन्स कॅम्प – उच्च कामगिरी साठीचे शिबिर – साठी निवड झाली होती . माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबीरात साहिलची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली होती. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली व ४ डावात १६८ च्या सर्वाधिक स्ट्राइक रेट नी ९१.६७ च्या सरासरीने एकूण २७५ धावा कुटल्या. साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती .

सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिघांचेही अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

Next Post

नाशिकमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकमंत्री भुसे यांची आज प्रशासनासोबत तातडीची बैठक…केले हे आवाहन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
Next Post
Dada Bhuse

नाशिकमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकमंत्री भुसे यांची आज प्रशासनासोबत तातडीची बैठक…केले हे आवाहन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011