मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात ५६ हजार ७८३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर, दिवसबरात ६७ हजार १२३ नव्याने बाधित झाले आहेत. राज्यात एकूण ४१९ जणांचा कोरोनामुळे दिवसभरात मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ४७ हजार ९३३ एवढी आहे. तर, आतापर्यंत ३० लाख ६१ हजार १७१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ९७० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.