मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बंधांची घोषणा राज्य सरकारने केली आहे हे नवे निर्बंध उद्या (९ जानेवारी) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
असे आहेत निर्बंध
– रात्री ११ ते सकाळी ५ या काळात राज्यामध्ये संचारबंदी असेल. म्हणजेच नाईट कर्फ्यू असेल.
– राज्यात आता जमावबंदी दिवसा असणार आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही.
– अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल. त्याशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध असेल
– सरकारी कार्यालयात सहजपणे भेट देता येणार नाही. आवश्यकता असेल तर मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी घ्यावी लागेल.
– खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक असेल. कार्यालयात ५० टक्क्यापेक्षा अधिक जणांना परवानगी राहणार नाही
– लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असेल
– अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी असेल
– सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी केवळ ५० जणांनाच परवानगी असेल
– राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असेल. ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवता येईल.
– राज्यातील सर्व स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद राहतील
– केश कर्तनालये केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. तर रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंदी असेल
– पर्यटन स्थळे बंद राहतील.
– पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क हे सर्व पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
– शॉपिंग मॉल्स, शो रुम्स आणि बाजार कॉम्पलेक्स हे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील
– रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत हॉटेल बंद राहतील. होम डिलिव्हरी मात्र सुरु राहील
– नाट्यगृह, सिनेमागृह हे केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत सिनेमागृह बंद राहतील.
– नाट्यगृह, सिनेमागृहे यामध्ये केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी असेल.