मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ६१ हजार ६९५ नेव कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर, ५३ हजार ३३५ जणांनी कोरोनावर मात केली असून दिवसभरात ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांचा आकडा ३६ लाख ३९ हजार ८५५ एवढा झाला आहे. यातील २९ लाख ५९ हजार ५६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, एकूण ५९ हजार १५३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये ६ लाख २० हजार ६० बाधित उपचार घेत आहेत.