विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात आज ६६ हजार ३५८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. आज नवीन ६७ हजार ७५२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ७२ हजार ४३४ ऍक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८३.२१ टक्के झाले आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.