मुंबई – राज्यात आज दिवसभरात ७४ हजार ४५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. तर, ६६ हजार ८३६ नवे बाधित झाले. तसेच, ७७३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ९१ हजार ८५१ एवढी आहे. आतापर्यंत ४१ लाख ६१ हजार ६७६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ३४ लाख ४ हजार ७९२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ६३ हजार २५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.