मुंबई – राज्यात आज दिवसभरात ६२ हजार २९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, ६७ हजार १३ जण नवे बाधित झाले. दिवसभरात ५६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४० लाख ९४ हजार ८४० जणांना लागण झाली आहे. त्यातील ३३ हजार ३० हजार ७४७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ९९ हजार ८५८ एवढी आहे.