मुंबई – राज्यात आज ५४,९८५ कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले. आतापर्यंत ३२,६८,४४९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१५ % झाले आहे. सध्या ६,९५,७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज ६७,४६८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.