मुंबई – राज्यात आज दिवसभरात ४५ हजार ६५४ जण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर, ६८ हजार ६३१ नवे बाधित आढळून आले आहेत. दिवसभरात ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर एकूण ६० हजार ४७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील आजची कोरोना स्थिती अशी