मुंबई – राज्यात दिवसभरामध्ये ५९ हजार ३१८ जण कोरोनाचे उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ३८९ नव्या बाधितांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात ९७४ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर मृतांची संख्या ८१ हजार ४८६ एवढी झाली आहे. आतापर्यंत ५३ लाख ७८ हजार ४५२ जण बाझित झाले आहेत. सध्या ४ लाख ६८ हजार १०९ जण उपचार घेत आहेत.