विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट पहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरामध्ये ३९ हजार ९२३ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर ५३ हजार २४९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ६९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली आहे. तर, आतापर्यंत ४७ लाख ७ हजार ९८० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत ७९ हजार ५५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नव्या बाधितांची संख्य घटत असल्याने कोरोनाचा प्रभाव ओसरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या क़क लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या निर्बंधांमुळेच कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.