मुंबई – राज्यात आज दिवसभरात ४० हजार ९५६ नवे कोरोना बाधित आढळून आले. ७१ हजार ९६६ जण उपचार घेऊन घरी गेले तर ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ जण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ७९ हजार ९२९ एवढी झाली आहे. आजवर ४५ लाख ४१ हजार ३९१ जणांनी कोरोनावर मात केली असून ७७ हजार १९१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.