मुंबई – राज्यात आज ५१ हजार ७५१ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन ५२ हजार ३१२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५ लाख ६४ हजार ७४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.९४% झाले आहे.