मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केला आहे. या पदासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत होतीत. मात्र काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांना यांना संधी दिली आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर रोज विरोधीपक्षनेतेपदाची चर्चा होती. पण, काँग्रेसने अधिवेशनाला आठवडा उलटूनही विरोधी पक्ष नेत्यांच्या नावाची घोषणा केली नव्हती. पण, आता विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आले होते,
याआधी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होते. पण, ते राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाल्यानंतर संख्याबळानुसार हे पद काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होते याची सर्वांमध्ये उत्सुकता होती.