मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची दुसरी यादी समोर आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता दुस-या यादीत २३ जणांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे दोन्ही यादी मिळून आता ७१ उमेदवार जाहीर झाले आहे. ९० जागा काँग्रेसच्या वाटयाला जाणार आहे. त्यामुळे १९ जागा अद्याप बाकी आहे.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत ६५ नावांचा समावेश होता. पण, त्यानंतर १ नाव सामना मध्ये वगळण्यात आले होते. त्यानंतर दुस-या यादीत १५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाचे ७९ उमेदवार जाहीर झाले आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गट ७९, काँग्रेस ७१ व राष्ट्रवादी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे आतापर्यंत १९५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अजून ९३ उमेदवारांची घोषणा बाकी आहे. यात १८ जागा या मित्रपक्षाला देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने ९०-९०-९० असा फॅार्म्युला निश्चित केला आहे. त्यात काही जागांची अदलाबदलही केली जाणार आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या ६५ जागांपैकी १२ जागामध्ये शरद पवार गट, काँग्रेस व शेकापने दावा केला आहे.