माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
उद्या शुक्रवार दि. १७ ते मंगळवार २१ फेब्रुवारी पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा साधारण २ ते ३ डिग्रीने वाढ होईल. त्यामुळे थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते. याचा अर्थ थंडी कायमची गेली असेही समजू नये.
या पाच दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा बुधवार दि.१८ फेब्रुवारीला नवीन पश्चिमी झंजावात काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखण्ड मध्ये प्रवेशित होण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामामुळे १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान तेथे पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात बुधवार, दि.२२ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरून थंडीची अपेक्षा करू या.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पाऊस अथवा गारपिटीची शक्यता नाही. येत्या ५ दिवसाच्या वाढत्या उष्णतेमुळे आगाप कांदा लागवडीचे सिंचन हे माफक पाण्यावर अथवा रात्रीचे करावे,असे वाटते.
आज विशेष इतकेच!
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1625754548488015872?s=20
Maharashtra Climate Winter Cold Weather Forecast