वातावरण निवळणार पण फक्त कोकण व विदर्भातच
खरं तर उद्या रविवार १६ एप्रिल पासुन संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेली अवकाळी वातावरण निवळणीची शक्यता केवळ कोकणातील ४ व विदर्भातील ११ अश्या एकूण १५ जिल्ह्यात केवळ दोन दिवसाकरिताच (दि.१६, १७) मर्यादित जाणवत आहे. मंगळवार दि.१८ एप्रिलपासुन पुन्हा ह्या ठिकाणी अवकाळी वातावरणाची शक्यता तशीच आहे.
मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अश्या एकूण १८ जिल्ह्यात मात्र अजुनही रविवार दि.२३ एप्रिलपर्यन्त अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून आहे, असे वाटते. मात्र येथे हेही नमूद करावेसे वाटते कि सदर ह्या आठवड्यात वातावरण जरी असले तरी तीव्रता मात्र कदाचित कमी असण्याची शक्यता जाणवते.
जो पर्यन्त दक्षिण अर्धभारतातील ‘ वारा खंडितता प्रणाली बदलत/ नामशेष होत नाही तो पर्यन्त महाराष्ट्रातीलही अवकाळी वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता मुळीच नाही, असेच वाटते. आज ह्या खंडिततेचा आस स. सपाटीपासुन ९०० मीटर उंची पर्यंत हवेचा निर्वात जाडीचा थर झारखंडपासुन ओरिसा आंध्रप्रदेश राज्यातून तामिळनाडू राज्यापर्यंत पर्यन्त पसरलेला आहे. सध्याची साधारण एक महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. तरी ही प्रणाली टिकून आहे.
ह्या कालावधीपूर्वी मध्य भारतात दोन्ही बाजूला समुद्रसपाटीपासुन साधारण ९०० मीटर उंचीपर्यन्त तयार झालेली दोन हवेच्या उच्चं दाबाची क्षेत्रे व त्यांच्या निर्मितीमुळे घड्याळ काटा दिशेने गोलाकार प्रत्यावर्ती चक्रीय वारे वाहत आहेत. आता अश्या दोन क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या भू – भागावर पूर्व-पश्चिम कित्येक कि.मी. रुंदीचा व ९०० मीटर उंचीपर्यन्त तयार झालेला पण दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या निर्वात जाडीचा कमी दाबाचा पट्टा म्हणजे ‘ आस ‘ (ट्रफ)तयार झाला आहे.
ह्या तयार झालेल्या हवेच्या निर्वात जाडीचा कमी दाबाचा पट्टा म्हणजे आस ‘ (ट्रफ)चे पूर्व-पश्चिम दिशेने होणाऱ्या दोलायनातून सध्या महाराष्ट्रासहित मध्य भारतात ही टिकून असलेली ‘ वारा खंडितता ‘ प्रणाली मुळे सध्या घोंगावत असलेल्या गारपीट व अवकाळी वातावरणापासून महाराष्ट्राची अजुनही कदाचित आठवडाभर म्हणजे रविवार दि.२३ एप्रिलपर्यन्त तरी सुटका होतांनाची शक्यता दिसत नाही.
मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी होणारा पूर्व-मोसमी (१५-२० मे नंतरचा) व सध्याच्या( मार्च-एप्रिल मधील) होणाऱ्या अवकाळी पावसात साध्यर्मता दिसत असली तरी त्यांचे स्वरूप त्या पाठीमागील वातावरणीय प्रणाल्याही किंवा कारणेही पूर्णपणे वेगवेगळे आहेत, हेही येथे हवामान साक्षरतेसाठी समजून घ्यावे, असे वाटते.
सध्या महाराष्ट्रात उष्णतेची काहिली वाटत असली तरी सदर तापमान सरासरीइतकेच जाणवत आहे. येत्या एक-दोन दिवसात ह्या उष्णतेत साधारण ३ डिग्रीपर्यंत वाढ होवु शकते. ह्याचा अर्थ उष्णतेची लाट येईल असा अर्थ काढू नये. वातावरणीय काही बदल दिसल्यास लिहिले जाईल.
सध्या इतकेच!
At Warugad & Bothe Taluka #Dahiwadi
सातारा जिल्हा आज. pic.twitter.com/wa3bzqwzQr— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 15, 2023
Maharashtra Climate Weather Forecast Unseasonal Rainfall