महाराष्ट्रात उष्णता, वळीव पाऊस, गारा असे संमिश्र वातावरण
नैरूक्त मान्सून अरबी समुद्रात प्रवेशला पण अजुन केरळात म्हणजे देशाच्या भु-भागावर अजुन प्रवेश नाही. परंतु पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल जाणवते. मान्सून जरी आज, उद्या केरळात पोहोचला तरी महाराष्ट्रात कोकण वगळता सह्याद्री ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात केवळ मान्सूनचा पाऊस पोहोचण्यास कदाचित अजुन आठवडाभर किंवा अधिक कालावधी म्हणजे १४ जून पर्यन्त पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण व गोव्यात मात्र पुढील आठवडाभर किरकोळ वळवाच्या पावसाची शक्यता जाणवते.
अरबी समुद्रात बुधवार दि.७ जून ला कमी दाब क्षेत्र निर्मितीच्या शक्यता व त्याच्या पुढील विकसनावर मान्सूनच्या वेगात आगमन किंवा आगमना नंतर कदाचित खण्ड अश्या काहीही शक्यता नाकारता येत नाही.
धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. ५ जूनपर्यन्त वीजा, वारा व गारासहित किरकोळ वळवाच्या पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे ४ ते ८ जून पर्यन्त संपूर्ण विदर्भ व लातूर नांदेड परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कदाचित जाणवू शकते, असे वाटते.
पश्चिम हिमालयीन ज.का., हि. प्र., उ. खंड हि राज्ये तसेच उत्तर भारतातील इतर उर्वरित राज्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पर्यटन तसे सह्य व सुरक्षितच समजावे, असे वाटते.
इतकेच!
Maharashtra Climate Weather Forecast