‘वारा-खंडितता’ प्रणाली नामशेष.
अवकाळी वातावरणातून महाराष्ट्राची हळूहळू सुटका.
गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसासाठी घोगावणारी ‘ वारा-खंडितता ‘ प्रणाली संपुष्टात आली असुन आजपासुन पुढील ३ दिवसानंतर म्हणजे बुधवार दि.१० मे पासुन संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे स्वच्छ होण्याची शक्यता जाणवते.
आगामी तीन दिवसात (७, ८ व ९ मे) मात्र महाराष्ट्रातील केवळ मुंबईसह रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर ह्या जिल्ह्यातच ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
बंगालच्या उपसागरात मंगळवार दि.९ मे ला विकसनाकडे झेपावणाऱ्या ‘ मोचा ‘ चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या वातावरणावर कोणताही परिणाम जाणवणार नाही. बद्री-केदार पर्यटकासाठी बुधवार दि. १० मे नंतर तेथील वातावरण निवळतीकडे झुकत असुन पश्चिम हिमालय चढाईसाठी सध्या तरी ठिक समजावे.
इतकेच!
7/5:द-पू बंगाल उपसागर,द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र;९मे पर्यंत अजून तीव्र (depression) होण्याची शक्यता.नंतर ?चक्रीवादळात रूपांतर व बंगाल उपसागरात उत्तरे कडे प्रवास
अंदमान,निकोबारला ८-१२ मे;मुसळधार-अती
मुसळधार पाऊस,समुद्र खवळलेला,वादळी वारे, मच्छिमारांना इशारे
IMD pic.twitter.com/EnMQG6Qp1u— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 7, 2023
Maharashtra Climate Weather Forecast