मुंबईत २ दिवस उष्णता सदृश्य स्थिती
बुधवार दि.१० मे पासुन असलेले ढगाळ वातावरण व दिवसाच्या कमाल तापमान साधारण २ ते ३ डिग्री वाढीमुळे आर्द्रतायुक्त व गरम अश्या हवेमुळे वातावरणातुन पुढील ४ दिवस म्हणजे रविवार १४ मे पर्यन्त मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवेल. त्यातही काल दि. १० व आज दि. ११ मे ला मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटसदृश्य स्थितीही जाणवू शकते, असे वाटते.

ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
उर्वरित महाराष्ट्रात सध्या सरासरीइतके किंवा त्याखाली जाणवत असलेले दिवसाचे कमाल तापमान पुढील ३ दिवस २ ते ३ डिग्रीने वाढण्याची शक्यता असुन त्यानंतर पुन्हा पूर्ववत होवु शकते, असे वाटते.
‘ मोखा ‘ चक्रीवादळाचे पोर्ट ब्लेअर पासुन ५०० किमी अंतरावर आज रात्री अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते.
इतकेच!
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1656569081875812353?s=20
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Climate Summer Heat Wave Forecast Weather