बातम्या अवकाळीच्या
पण तीव्रता विदर्भातच अधिक
उद्या सोमवार दि.२४ एप्रिल पासुन पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार दि.२८ एप्रिल पर्यन्त, विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात क्वचित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भात मात्र अवकाळी वातावरणासहित पावसाची तीव्रता ह्या ५ दिवसात अधिक राहून गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही. मराठवाड्यातही गुरुवार-शुक्रवार ( दि.२६-२७ ला) पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
पुढील ५ दिवस महाराष्ट्रात किमान तापमान ४ डिग्रीने तर कमाल तापमान २ डिग्रीने सरासरीपेक्षा कमी राहून आल्हाददायक वाटेल. तर ५ दिवसात कोणत्याही उष्णतेच्या लाटीची शक्यता महाराष्ट्रात नाही. रांची ते ते मदुराईपर्यन्त पर्यन्त ‘ वाराखंडिता प्रणाली ‘ टिकून आहे.
पूर्व मोसमी (मार्च ते मे) हंगामात वातावरणाचा विशेषतः ‘ वारा खंडितता ‘ नॉर्मल पॅटर्न जसा असावा तसा तो ह्यावर्षी गेल्या ८ मार्च पासुन नाही. नॉर्मल पॅटर्न हा पूर्व किनारपट्टी समांतर जमीन भू-भागावर झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यन्त स. सपाटीपासुन एक ते दिड किमी. उंचीवर हवेचा निर्वात दाबाचा आस (ट्रफ) असतो, कि जो आज वर सांगितल्याप्रमाणे आहे.
या वर्षी तो दक्षिणोत्तर दिशास्थित उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण चेन्नईपर्यन्त दोलायनात फिरत राहिला. त्यामुळे दक्षिण अर्ध भारत( द्वीप-कल्पात)१५ ते २० डिग्री अक्षवृत्त दरम्यान हवेचे उच्चं दाब क्षेत्र दोन समुद्रात दोन्ही बाजूला टिकून राहिले तर जमिनीवर ‘ वारा खंडितता ‘ व हवेचा निर्वात दाबाचा आस (ट्रफ) निर्मितीमुळे दिड महिना अवकाळी वातावरण टिकून राहिले. त्याचाच परिणाम अजुनही संपलेला नाही.
23/4, 850hpa IMD GFS model guidance indicate,Trough/wind discontinuity frm MP to int Chennai at lower levels.Cycir also as indicated.
विदर्भात मेघ गर्जना, विजार, जोरदार वारे सह हलका ते मध्यम पावसाची शक्यता येत्या २,३ दिवसात. विदर्भात उद्या तुऱ़ळक ठिकाणी गारपीटीची शक्यता. TC
-IMD pic.twitter.com/4JdNLz4uyA— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 23, 2023
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Climate Hailstorm Forecast Unseasonal Rainfall