नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उद्या (२३ मे) शून्य सावली दिवस असणार आहे. विशिष्ठ वेळेत दुपारच्या सुमारास उभ्या वस्तूची सावली दिसणार नाही. यासंदर्भात स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार खालील शहरांमध्ये शून्य सावली दिवस अनुभवास येईल
शून्य सावली दिवसाचे गाव आणि वेळ
●कुरखेडा (दुपारी 12.06)
●देसाईगंज (12.07)
●ब्रम्हपुरी(12.07)
●नागभिड (12.08)
●हिंगणघाट (12.11)
●पुलगाव (12.13)
●मुर्तिजापूर(12.17)
●अकोला (12.18),
●खामगाव (12.20)
●बोरखेडी(12.22),
●धामणगाव-बुद्धे (12.22)
●फतेपुर (12.23)
●भाडगाव (12.25)
●सातपुडा (12.31)
●मालेगाव(12.28)
●रावळगाव (12.29)
●सतना (12.30)
●देसरने (12.30)
●चोढा (12.33)
●वलसद (12.35)