नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंगची टांगती तलवार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वीज एक्सचेंजवर व्यापार करण्यास बंदी घालण्यात आल्याने अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, छत्तीसगड, तमिळनाडू, तेलंगणा, मध्यप्रदेश, मिझोराम, झारखंड, बिहार, राजस्थान, आंध्रप्रदेश आधी राज्यांचा यात समावेश आहे. १९ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नवीन लेट पेमेंट सरचार्ज नियमांअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सीएनबीसी-टीव्ही१८ने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातील काही राज्यांना पॉवर एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवर खरेदी विक्री करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. लेट पेमेंट सरचार्ज नियम पॉवर एक्सचेंजपासून डिस्कॉम प्रतिबंधित करते. जेव्हा सात महिन्यांपेक्षा जास्त काळ जेनकोला थकबाकी दिली जात नाही तेव्हा असे घडत असल्याचे सांगितले जात आहे. या नियमांनुसार या राज्यांवर कारवाई करण्यात आली आहे. इंडियन एनर्जी एक्सचेंज या बातमीमुळे दबावाखाली आली आहे. येत्या काळात इंडियन एनर्जी एक्सचेंजवरील ट्रेडिंग व्हॉल्यूमवर परिणाम होऊ शकतो. पॉवर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर ३.६ टक्क्यांनी घसरुन १६६.३५ रुपयांवर बंद झाले.
Maharashtra Chances Load Shading Reason
Dues Paid Electricity Shortage