नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखा यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर सुवर्ण महोत्सव वर्ष निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमसाठी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जळगावचे खासदार श्री. उन्मेष पाटील, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह उपस्थित राहणार आहेत.
उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या व्यक्ती संस्था यांनी भरीव योगदान दिले आणि खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली अशा निवडक संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान माननीय राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सत्कार समारंभामध्ये येथील हिंदुस्थान एरोनाटिक्स लिमिटेड- नाशिक, महिंद्रा अँड महिंद्रा- नाशिक, जैन इरिगेशन सिस्टिमस लिमिटेड -जळगाव, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री -धुळे, शिरपूर एज्युकेशन सोसायटी- धुळे, मालपाणी ग्रुप- संगमनेर, अहमदनगर, सहयाद्री फार्म-नाशिक, बेदमुथा इंडस्ट्री-नाशिक महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन-धुळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रम प्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागात विविध क्षेत्रात असलेल्या गुंतवणुक विकास पायाभूत सुविधा उद्योग आयटी उद्योग कृषिमाल प्रक्रिया क्लस्टर डेव्हलपमेंट अशा अनेक विषयांसंबंधी विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. श्री जितूभाई ठक्कर श्री अशोक कटारिया श्री स्वामी शिखानंद, श्री अशोक जैन, श्री किरण चव्हाण, श्री निखिल पांचाळ, श्री. पियुष सोमानी, श्री राज नगरकर, श्री संजय कोठेकर मान्यवर मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर कडून यासंबंधीचा एक रोड मॅप केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांचे संबंधित मंत्री अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे
या परिषदेअंतर्गत स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट या विषयावर दुपारच्या सत्रात श्री दीपेंद्रसिंह कुशवाह कौशल्य विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषदेत विविध कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत सदर परिषदेत सर्व व्यापार उद्योग कृषी या क्षेत्रातील व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर तर्फे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन श्री संजय सोनवणे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर देशमुख तर आभार प्रदर्शन उमेश वानखेडे यांनी केले. याप्रसंगी नाशिक शाखा चेअरमन सौ. सुनिता फाल्गुने, श्री. विजय वेदमुथा, सौ. नेहा खरे , श्री. संजय राठी आदिसह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.