नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात इतर विभागात निवडणूक बिनविरोध होऊन उत्तर महाराष्ट्र विभाग व नाशिकमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होती. विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर,माजी अध्यक्ष श्री. विक्रम सारडा, माजी अध्यक्ष श्री. हेमंत राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी एकत्र बसून सामंजस्याने उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंत निवडणूक झाली नव्हती याचा विचार करून कार्यकारिणी पदांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये श्री. सुधाकर देशमुख यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्याचा व सौ. सुनिता फाल्गुने यांना नाशिक शाखा चेअरमन पदी व श्री. संजय सोनवणे यांना को-चेअरमन पदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. हेमंत गायकवाड, श्री. संदिप भंडारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
कार्यकारीणी सदस्यपदी श्री. हेमंत गायकवाड, श्री. कैलास आहेर, श्री. व्हिनस वाणी, श्री. संजय राठी, श्री. रवी जैन, श्री. रविंद्र झोपे, श्री. हेमंत कांकरिया, श्री. नेमिचंद कोचर, श्री. मनिष रावल, श्री. संजय महाजन, श्री. सचिन शहा, श्री. अंजु सिंघल, श्री. भावेश मानेक, श्री. राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस, श्री. स्वप्निल जैन, श्री. दत्ता भालेराव, श्री. राजाराम सांगळे,श्री. सचिन जाधव , श्री. मिलिंद राजपूत, श्री. प्रशांत जोशी यांना कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष श्री. विक्रम सारडा, माजी अध्यक्ष श्री. हेमंत राठी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यापुढील काळात राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व महाराष्ट्र चेंबरच्या विकासासाठी सामूहिकपणे कार्यरत राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. सुभाष घिया, श्री. ललित नहार, श्री. संदिप कर्नावट, श्री. मयूर सराफ आदि प्रयत्नशील होते.