कार्यकारिणी सभेत अध्यक्ष ललित गांधी यांच्याद्वारे नियुक्ती जाहीर
नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या मुंबई येथे झालेल्या ५व्या कार्यकारणी सभेत उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमनपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल चोपडा यांची अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी नियुक्ती केली. आमदार व माजी वस्त्रोउद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते कांतीलाल चोपडा यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून वस्त्रोउद्योगाकरीता भरीव कार्य करण्याचे आयोजिले असून वस्त्रोउद्योग समितीवर आमदार प्रकाश आवाडे यांची चेअरमनपदी निवड केल्याचे सांगितले. तसेच अग्रिकल्चर,फूड प्रोसेसिंग समितीच्या को-चेअरमनपदी मयांक गुप्ता यांची नियुक्ती केली. अध्यक्ष ललित गांधी यांनी कार्यकारिणी समिती तसेच विविध तज्ञ समितीवर नवीन व त्या त्या विषयातील तज्ञ उमेदवारांना संधी दिल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरचे कार्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवावे, स्थानिक व्यापारी, औद्योगीक संघटनाशी समन्वय करावा, येत्या २ वर्षात कृषी, महिला व उत्पादणाधारित क्लस्टर उभारण्यात येणार असून महाराष्ट्र चेंबरचे राज्यातील व्यापार उद्योग, कृषी क्षेत्रासाठीचे व्हिजन सांगितले व नियुक्त केलेल्या मान्यवरांना समितीचे काम करण्याबाबत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा यांनी अध्यक्ष ललित गांधी यांनी दिलेली जबाबदारी मोठी असून उत्तर महाराष्ट्र विभागातील व्यापार, उद्योग व कृषि क्षेत्रासाठी विविध उपक्रम आयोजित करून भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच टेक्सटाईल समितीचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी वस्त्रोउद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवून विकास करण्याचे आश्वासन दिले. अग्रिकल्चर,फूड प्रोसेसिंग समितीचे को-चेअरमन मयांक गुप्ता यांनीही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करून उत्कृष्ट कार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.