मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्र्यांचे खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. हे संभाव्य खातेवाटप असे
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री – नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री – गृह व अर्थ
भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर – महसूल
२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर – ऊर्जा, वन
३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे – सार्वजनिक बांधकाम
४. विजयकुमार गावित – नंदुरबार – आदिवासी विकास
५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव – जलसंपदा
६. सुरेश खाडे – मिरज, सांगली – सामाजिक न्याय
७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई – गृहनिर्माण
८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व – आरोग्य
९. मंगलप्रभात लोढा – मुंबई – विधी व न्याय
एकनाथ शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – पाणीपुरवठा
२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक – कृषी
३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ – ग्रामविकास
४. संदीपान भुमरे – पैठण, जालना – रोजगार हमी
५. उदय सामंत – रत्नागिरी – उद्योग
६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद – उच्च व तंत्रशिक्षण
७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद – अल्पसंख्याक विकास
८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग – पर्यावरण, पर्यटन
९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा – उत्पादन शुल्क
Maharashtra Cabinet Portfolio Declared