नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. यावेळी त्यांनी नाशिकसाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यानुसार नाशिक-पुणे मध्यम-अतिजलद रेल्वे प्रकल्पाचा ८० टक्के भाग राज्य शासन उचलणार आहे. नाशिक मध्ये फिजिओथेरिपी केंद्र उभारण्यात येणार आहे. नाशिक मधील आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. नवउद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक मधील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारणार आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1502222829143478273?s=20&t=f1Vclc2ymtE8yEkdxTxzEw