मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात सादर केला. त्यात त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
– स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य
– सरकारकडून २५० कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा
– गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रूपये उपलब्ध करून देणार
– महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे.
– कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
– कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार
– ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी
– शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार
https://twitter.com/MahaDGIPR/status/1502213505662926848?s=20&t=f1Vclc2ymtE8yEkdxTxzEw
– विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी
– पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार
– कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी
– शेततळ्यांना आता ७५ हजारांचे अनुदान देणार
– आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
– नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापण करणार
– ग्रामीण भागातील किडनीच्या रुग्णांसाठी लेप्रोस्कॉपी मोफत करण्यात येणार यासाठी 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार
– मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
– कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
– अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार
– जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार
– ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार
https://twitter.com/NCPspeaks/status/1502211661390020609?s=20&t=f1Vclc2ymtE8yEkdxTxzEw
– सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार
– 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य
– जलसंपदा विभागासाठी १३,२५२ कोटींच्या निधीची तरतूद
– आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी
– प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार
– देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार. त्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था स्थापन करण्यात येणार
– हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील
– 8 कोटी रुपयांची 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार
https://twitter.com/NCPspeaks/status/1502215371956580358?s=20&t=f1Vclc2ymtE8yEkdxTxzEw