बुधवार, ऑक्टोबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही…बघा, अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

मार्च 10, 2025 | 3:26 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 31

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:
उद्योग विकास :
📊महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार, त्यानुसार ५ वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मिती

📊केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार

📊10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार

📊मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे “ग्रोथ हब” म्हणून विकसित करणार, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करणार, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत ३०० बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट

📊गडचिरोली जिल्हा “स्टील हब” म्हणून उदयास येणार, गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये

📊सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 6 हजार 400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान

📊ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत

📊राज्यात “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना

📊नागपूर येथे “अर्बन हाट केंद्रां”ची स्थापना

📊नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर-इनोव्हेशन सिटी

पायाभूत सुविधा विकास
📊 पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26 टक्के सहभाग

📊वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडणार

📊काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु होणार

📊गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण

📊महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित शोअर प्रकल्प

📊महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता

📊अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार

📊आशियाई विकास बँक प्रकल्प, टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेणार.

📊सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 36 हजार 964 कोटी रुपये किंमतीची 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे

📊प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3, सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट

📊मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3, एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार-प्रकल्प किंमत 30 हजार 100 कोटी रूपये

📊हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित करणार, प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना होणार

📊महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या 760 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर

📊ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग उभारणार.

📊स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करणार

📊उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार

📊पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार

📊तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित

मेट्रो
📊मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे १० लाख प्रवाशांचा रोज लाभ

📊येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार, येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार

📊नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर

विमानतळ

📊छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार

📊नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार

📊नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण

📊शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता- नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करणार

📊अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण – 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करणार

📊रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर

📊गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु

📊अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार
📊6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करणार- नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य

कृषि व संलग्न क्षेत्रे

📊 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा- २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय

📊 “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी

📊महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर

📊जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची एकूण १ लाख 48 हजार 888 कामे हाती घेणार, अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करणार

📊“गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार” योजना कायमस्वरुपी राबविणार

📊वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता -अंदाजित किंमत 88 हजार ५७4 कोटी रुपये -लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर

📊 नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ-प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये

📊दमणगंगा -एकदरे -गोदावरी या 2 हजार 300 कोटी रूपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार

📊तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ
📊कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार, मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार

📊सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना-1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता

📊गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
📊 38 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार – 2.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 90 हजार रोजगार निर्मिती

📊मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज

📊राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी

📊नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेचा 8 हजार 2०० कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार

📊बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ४ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार

📊 “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2025” राज्यात विविध कार्यक्रम, महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार

📊 2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार

📊राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार

📊शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार

📊बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार
…….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न…न्यायालयाच्या आदेशाने पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प… अजित पवार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य…

ऑक्टोबर 28, 2025
MOBILE
महत्त्वाच्या बातम्या

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं…

ऑक्टोबर 27, 2025
IMG 20251027 WA0037
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

ऑक्टोबर 27, 2025
1002726049
महत्त्वाच्या बातम्या

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना…

ऑक्टोबर 27, 2025
rainfall alert e1681311076829
मुख्य बातमी

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

ऑक्टोबर 27, 2025
Next Post
ajit pawar11

‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प… अजित पवार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011