मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील गावांची खदखद आता समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्रात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने शेजारील राज्यांमध्ये जाण्याचा मानस ही गावं व्यक्त करत आहेत.
सातपुड्यातील चार गावांना मध्यप्रदेशात जायचं असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या चार गावांतील नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन देणार आहेत.
सांगलीजील जत तालुक्यातील जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, माडग्याळ, अंकलगी, अंकलगी तांडा, लकडेवाडी, निगडी बुद्रुक, सुसलाद, उमदी, सोनलगी, बालगाव, बेळोंडगी, करजगी, हळ्ळी, बोर्गी, बोर्गी बुद्रुक, अक्कळवाडी, माणिनाळ, गुलगुंजनाळ, मोरबगी, भिवर्गी, कोंत्येवबोबलाद, करेवाडी, तिकोंडी, कागनरी, खंडनाळ, संख, दरीबडची, दरीबडची तांडा, मुचंडी, रावळगुंडवाडी, खोजानवाडी, उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड, साळमळगेवाडी, वळसंग, कोळगिरी, गुड्डापूर, वज्रवाड, बिळूर, मेंढेगिरी, आसंगी तुर्क, आसंगी बाजार, पांडोझरी, लवंगा, गिरगाव या गावांनीदेखील हेच म्हणणे मांडले आहे.
जत तालुक्याचा प्रश्न जिवंत असतानाच नांदेडमधील काही गावांनी महाराष्ट्र सोडण्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात देगलूर तालुक्यातील होट्टल, येरगी, नागराळ, भक्तापूर, बागन टाकळी, हनुमान हिप्परगा, नरंगल, सावरगाव, सांगवी उमर, मेदनकल्लूर, तमलूर, शेवाळा, शेळगाव, नंदूर या १३ गावांचा समावेश आहे. तर बिलोली तालुक्यातील थडी हिप्परगा, दौलतापूर, सगरोळी, बोळेगाव, येसगी पुनर्वसन, कार्ला बु. पुनर्वसन, कार्ला बु. जुने गाव, कार्ला खुर्द पुनर्वसन, कार्ला खुर्द जुनेगाव, बावलगाव, गंजगाव, माचनूर, नागणी, हुनगुंदा या १५ गावांचा समावेश आहे.
याशिवाय, धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी, नायगाव ध, बोल्लूर खु., बेल्लूर बु. येवती, येताळा, जुन्नी, हस्नाळी, राजापूर, चिंचोली, बाभळी, शेळगाव, माश्टी, संगम, मनूर, बामणी, ईळेगाव, सिरसखोड, जाखलापूर ही गावं, उमरी तालुक्यातील बोथी, तुराटी ही दोन गावं, किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ, गोंडेमहागाव, गोंडजेवली, चिखली ई., कंचली, मारलागुंडा, तोटंबा, तोटंबा तांडा, मानसी नाईक तांडा, आंदबोरी ई., व्यंकटरमण तांडा, मलकजाम, मलकजाम तांडा, ईंजेगाव, सिनगारवाडी, सुंगागुडा, पिंपरहोडी या १७ गावांचा समावेश आहे.
नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता या निर्णयावर सरपंचांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या गटाने तेलंगणात जायचे नाही, परंतु विकास करा, अशी भूमिका घेतली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने मंगळवारी सीमावर्ती भागातील सरपंचांची बैठक घेतली. या बैठकीला २० सरपंच उपस्थित होते.
तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील १४ गावांनाही महाराष्ट्र नकोसा झाला असून, परमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येस्सापूर, लेंडिगुडा, पळसगुडा ही आठ महसुली गावे आणि परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पदमावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा गुडे/पाडे या गावांचा त्यात समावेश आहे. यातील महाराजगुडा येथील १६ नागरिक व परमडोली तांडा येथील काही नागरिक तेलंगणात जाण्यासाठी आग्रही आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या तडवळ, आळगी, अंकलगी, म्हैसलगी, खानापूर, गुड्डेवाडी, शेगाव, धारसंग, कल्लकर्जाळ, मुंढेवाडी, कोर्सेगाव, केगाव खु., केगाव बु., सुलेरजवळगा, मंगरुळ, देवीकवठा, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., कुडल, शावळ, हिळ्ळी, उडगी, खैराट । दक्षिण सोलापूर तालुका – १० गावे – हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरुर, चिंचपूर, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव या गावांचादेखील यात समावेश आहे.
सुरगण्यातील आंदोलन स्थगित
महाराष्ट्राकडून सुविधा मिळत नसल्याने, गुजरातमध्ये समाविष्ट होण्याच्या प्रश्नावर नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील सरपंचांमध्येच दोन गट पडल्याने गुजरातमध्ये जाण्याची आग्रही भूमिका घेणारे चिंतामण गावित एकाकी पडले आहेत. एका गटाने आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली, तर गावित यांच्यासोबत आलेल्या काही सरपंचांनीही महाराष्ट्रात राहणार असल्याचा शब्द दिला. महाराष्ट्रात बंजारा समाज एन. टी. प्रवर्गात मोडतो तर तेलंगणात एस.टी. प्रवर्गात त्यांचा समावेश आहे. तेलंगणात एस.टी. प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्याने सुविधा मिळतात. नोकरीत प्राधान्य आहे. विशेष काही जणांना तेलंगणा सरकारने शेतीचे पट्टे दिले आहेत. त्यावर लाभ घेणे सुरू आहे. म्हणून त्यांचा कल तेलंगणाकडे आहे. महाराजगुडा या गावातील काही जण तेलंगणात जाण्यास तयार आहेत.
या सुविधांची ‘ऑफर’
शेतीसाठी तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी, शेतीपंपांसाठी मोफत वीज, ६० वर्षांवरील व्यक्तीला प्रतिमाह पेन्शन, सवलतीच्या दरात बी-बियाणे व खते, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पाच रुपये किलो दराने ३० किलो तांदूळ, सीमेलगतच्या विद्यार्थ्यांना गडीनाडू प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी व अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश, तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, अनुदानावर पाइप, खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर, स्प्रिंकलर सेट, ताडपत्री वाटप. शाळा, अंगणवाडी, पाणी, ग्रामपंचायत, मुलींच्या लग्नाकरिता १ लाख ११६ रुपये मोफत, मागासवर्गीयांना व्यवसायासाठी दहा लाख रुपये, शेतकऱ्यांना प्रति एकर सरसकट दहा हजार रुपये, विधवा किंवा निराधारांना प्रति महिना दोन हजार रुपये व दिव्यांगांना प्रति महिना तीन हजार रुपये अशा अनेक सुविधांची ऑफर इतर राज्य देऊ पाहत आहेत.
Maharashtra Border Villages Issues