पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदाच्या निकालात ९५.८७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.०५ टक्के एवढे आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल जाहीर केला आहे. तसेच, विभागवार टक्केवारीही जाहीर झाली आहे. राज्याच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर, नागपूर विभाग हा सर्वात शेवटी आहे.
विभागनिहाय निकाल असा
कोकण : ९८.११ टक्के
कोल्हापूर : ९६.७३ टक्के
पुणे : ९५.६४ टक्के
मुंबई : ९३.६६ टक्के
औरंगाबाद : ९३.२३ टक्के
अमरावती : ९३.२२ टक्के
लातूर : ९२.६७ टक्के
नाशिक : ९२.२२ टक्के
नागपूर : ९२.०५ टक्के
दुपारी १ वाजता निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल उद्या, २ जून दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने
(http://verification./mh-ssc.ac.in) अर्ज करता येईल.
Maharashtra Board SSC Result Declared