ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १३ जणांचा बळी गेला आहे. मात्र, या सोहळ्यात चेंगराचेंगरीही झाल्याचे बोलले जात आहे. याच सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यातील एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला आहे. तसेच, त्यांनी यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. दुपारच्या वेळी झालेल्या या कार्यक्रमामुळे उष्माघाताने अनेकांना त्रास झाला. शेकडो जणांना याचा त्रास झाला. या सर्वांना नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील १३ जणांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर सर्वच स्तरातून सध्या संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1648358269281337345?s=20
Maharashtra Bhushan Award Ceremony Stampede Video Viral