मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आले. आता आजचे कामकाज सुरू झाले आहे.
सकाळच्या सुमारासच प्रश्नोत्तराचा घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी एसटी महामंडळाचा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही महामंडळाची स्थिती बदललेली नाही. कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच आहेत. यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री दादा भुसे हे उत्तर देण्यास उभे राहिले. यावेळी त्यांनी महामंडळाच्या विविध योजना आणि अन्य माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, चव्हाण उभे राहिले आणि त्यांनी विचारले की, माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की, राज्य सरकारची भूमिका काय आहे, आम्हाला योजनांची माहिती नको आहे. त्यावेळी प्रसंगावधान लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी सभागृहाला सांगितले की, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारचे जे धोरण आणि भूमिका होती तीच आमची आहे. त्यात काहीही बदल नाही, असे सांगत फडणवीस यांनी सारवासरव केली.
बघा, कामकाजाचे थेट प्रक्षेपण