मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात स्थापन झालेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारने अग्नीपरीक्षा पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज बहुमत सिद्ध केले. सत्ताधारी सरकारच्याबाजूने १६४ आमदारांनी मतदान केले.
कालच सत्ताधारी सरकारच्या गटाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यामुळे सरकारकडे बहुमत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आज ती पूर्ण झाली. भारतीय जनता पक्षाचे १०६, बंडखोर शिंदे गट आणि अपक्ष ५८ आमदारांनी आज सरकारच्याबाजूने मतदान केले. आजच्या या चाचणीचे विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे हिंगोली येथील आमदार संजय बांगर यांनी रात्रीच बंडखोर शिंदे गटात प्रवेश केला. काल रात्रीच ते बंडखोर आमदारांचा गट निवासी असलेल्या हॉटेलमध्ये ते दाखल झाले. आज सकाळी ते शिंदे गटाच्याच बसमधून विधीमंडळात आले. त्यामुळे सत्ताधारी गटाला आणखी एका आमदाराचे बळ मिळाले.
बहुमत चाचणी आणि मतदानाचा बघा हा व्हिडिओ
https://youtu.be/NDIZwhk6aGc
Maharashtra Assembly Special Session Floor Test Shinde Government Live telecast