मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक होत विधानभवनाच्या पायर्यांवर हातात गुढी घेऊन जोरदार निदर्शने केली. @AjitPawarSpeaks #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/CdtYx6dNum
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 21, 2023
Maharashtra Assembly Session Opposition MLA Agitation