मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून येथे होणार आहे. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत होणारे हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण म्हणजे कोविड-१९प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. या बैठकीत कामकाजाचा दिनक्रम, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे आदींबाबत चर्चा झाली.
हे मुद्दे गाजणार
टीईटी परीक्षा गैरव्यवहार, आरोग्य भरती गोंधळ, म्हाडा भरती पेपर रद्द होणे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोविड मृतांना मदत, ड्रग्ज प्रकरण अशा विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. त्यामुळेच त्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे.