मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच सकाळी १०.३० वाजता भाजपने विधिमंडळाच्या पाय-यावर बसून आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, ओबीसी आरक्षणाबात सरकार ठराव आणणार आहे. हे सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण आहे. हा ठराव दिशाभूल करणारा आहे. तरीही आम्ही या ठरावाला समर्थन देऊ असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय मागासलेपणाची एम्पिरीयल इन्कॅायरी करायची गरज असल्याचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी एमपीएससीच्या मुद्दयावर विरोधकाडून स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात दोन पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. वाजेच्या पत्रावरुन सीबीआय चौकशी करावी असे एक पत्र होते. दुसरे पत्र कारखान्यासंदर्भात होते. त्यात गडकरींनी दोन कारखाने घेलते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गडकरींची भूमिका पारदर्शक आहे. बँकाच्या किंमतीपेक्षा अधिक किंमतील नितीन गडकरी यांनी कारखाने घेतल्याचेही ते म्हणाले.